१९९२ पासून दर्जेदार निर्मिती व शास्त्रशुद्ध कलाशिक्षण. कलाविष्काराची दर्जेदार परंपरा
१ नोव्हेंबर १९९२ या स्थापना दिनानंतर, साधना ईश्वर या संस्थेने स्थानिक, सामाजिक व शालेय स्तरावर वैविध्यपूर्ण सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. या अंतर्गत नाटक, वाद्यवृंद, नृत्य व तत्सम कलाविष्कारांचा अंतर्भाव होता. स्पर्धा, गणेशोत्सव व इतर. अशा वैविध्यपूर्ण प्रदीर्घ प्रवासाअंती, २000 साली वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहातील शुभारंभानंतर शिवाजी मंदिर, गडकरी रंगायतन, आचार्य अत्रे रंगमंदिर, दिनानाथ नाट्यगृह, सर्वेश हॉल, दामोदर नाट्यगृह, प्रबोधकार ठाकरे इत्यादी नाट्यगृह पादाक्रांत करून व्यावसायिक बालनाट्य - नाटकात आपले पाय रोवले.
शिबिरांचे आयोजन, मोठ्यांची व्यावसायिक नाटके, इव्हेंट्स व सर्व प्रकारचे उपक्रम राबविले.
संस्थेचे अनेक कलाकार नाटक, चित्रपट, जाहिरात व इतर क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहेत.
नृत्य संगीताचे कार्यक्रम, शॉर्टफिल्म, लघु चित्रपट, इव्हेंट्स व विविध कार्यक्रम इत्यादी सर्वच निर्मित क्षेत्रात अग्रेसर राहून अनेक चांगले कलाकार घडविले.
तसेच 'लोकशाही झिंदाबाद' या चित्रपटाचीही स्वबळावर निर्मिती केली.
यापुढेही अशाच दर्जेदार कलाकृती रसिक प्रेक्षकांना देण्याचा साधना ईश्वर चा मानस आहे. आपल्या अंगभूत कलाकौशल्याला साकार करण्यासाठी साधना ईश्वर मध्ये सहभागी व्हा. सर्वच कार्यक्रमात, नाटकाच्या निर्मितीत, चित्रपटाच्या शूटिंगमध्ये, लेखन, अभिनय, दिग्दर्शक, डंबिंग, मिक्सिंग, रंगभूषा, वेशभूषा इत्यादी अंगाचे शिक्षण घेऊन विविध कलास्तरावर यश संपादन करा.

राजेश मयेकर